आंतरिक शोध

वाचकांना विनंती !

Clear List
१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.

२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

संगणकीय पत्ता :baalsanskar@gmail.com


महाराणा प्रताप

Clear List

अधिक माहिती येथे वाचा ....

करुणाष्टके

मूल्यांकन : Not Rated | वाचक संख्या : 1224

अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥

विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।
तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥
रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।
दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥

तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें ।
तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥
प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।
अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।
सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।
म्हणवुनि करूणा हे बोलतो  दीनवाचा ॥ ५ ॥

जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी ।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।
षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।
शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।
तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥

सबळ जनक माझा राम लावण्यकोटी ।
म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥
दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं ।
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥
जळधरकण आशा लागली चातकासी ।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥

तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥
सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।
रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती ।
विषय सकळ  नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥

सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे ।
जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥
विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं ।
रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥

सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें ।
भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले ॥
भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना ।
परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना ॥ १३ ॥

उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं ।
सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥
घंडिघडि मन आतां रामरूपीं भरावें ।
रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥

जळचर जळवासी न्स्णती त्या जळासी ।
निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ॥
भुमिधर निगमांसी वर्णवेना जयासी ।
सकळभुवनवासी भेट दे रामदासीं ॥ १५ ॥

असंख्यात ते भक्त होऊनि गेले ।
तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले ॥
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १६ ॥

बहू दास ते तापसी तीर्थवासी ।
गिरिकंदरी भेटी नाहीं जनासी ॥
स्थिती ऎकतां थोर विस्मीत झालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलॊं ॥ १७ ॥

सदा प्रेमराशी तयां भेटलासी ।
तुझ्या दर्शनें स्पर्शनें सौख्यराशी ॥
अहंता मनीं शब्दज्ञाने बुडालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १८ ॥       

तुझ्या प्रीतीचे दास जन्मास आले ।
असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ॥
बहू धारणा थोर चकीत जालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १९ ॥

बहुसाल देवालयें हाटकाचीं ॥
रसाळ कळा लाघवें नाटकाचीं ॥
पुजा देखितां जाड जीवीं गळालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २० ॥

कितेकीं देह त्यागिले तूजलागीं ।
पुढे जाहले संगतीचे विभागी ॥
देहेदु:ख होतांचि वेगीं पळालों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २१ ॥

किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती ।
किती धर्मसंस्थापना अन्नशांती ॥
पस्तावलों कावलों तप्त जालॊं ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २२ ॥

सदा सर्वदा राम सोडूनि कामीं ।
समर्था तुझे दास आम्ही निकामी ॥
बहू स्वार्थबुद्धीनें रे कष्टवीलों ।
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ २३ ॥

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांही ।
नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं ॥
असा दीन अज्ञान मी दास तूझा ।
समर्था जनीं घेतला भार माझा ॥ २४ ॥

उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी ।
अती आदरें सर्व सेवा करावी ॥
सदा प्रीती लागो तुझे गूण गातां ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २५ ॥

सदा सर्वदा योग तूझा घडावा ।
तुझे कारणीं देह माझा पडावा ॥
उपेक्षूं नको गूणवंता अनंता ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २६ ॥

नको द्रव्य- दारा नको येरझारा ।
नको मानसीं ज्ञानगर्वें फुगारा ॥
सगूणीं मना लाविं रे भक्तिपंथा ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २७ ॥

मनीं कामना कल्पना ते नसावी ।
कुबुद्धी कुडी वासना नीरसावीं ॥
नको संशयो तोडिं संसारव्यथा ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २८ ॥

समर्थापुढें काय मागों कळेना ।
दुराशा मनीं बैसली हे ढळेना ॥
तुटो संशयो नीरसी सर्व चिंता ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ २९ ॥

ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें ।
म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे ।
सुटे ब्रीद आम्हांसि सांडूनि जातां ।
रघूनायका मागणें हेंचि आतां ॥ ३० ॥

विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं ।
कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं ॥
स्वहीत माझें होतां दिसेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३१ ॥

विषया जनानें मज लाजवीलें ।
प्रपंचसंगे आयुष्य गेलें ॥
समयीं बहू क्रोध शांती घडेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३२ ॥

संसारसंगे बहु पीडलों रे ।
कारुण्यसिंधू मज सोडवीं रे ॥
कृपाकटाक्षें सांभाळि दीना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३३ ॥

आम्हां अनाथांसि तूं एक दाता ।
संसारचिंता चुकवीं समर्था ॥
दासा मनीं आठव वीसरेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३४ ॥



संबंधित लेख

» संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळची प्रार्थना
» पसायदान
» श्रीगुरूंचा श्लोक
» सरस्वती वंदना
» गीता अध्याय १५
» गीता अध्याय १२
» एकश्लोकिमहाभारतम् ।


प्रतिक्रिया

प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Itihas
Vadhdivas
Participate