Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,<!--@@CommonKeywords@@-->

महाराणा प्रताप


अधिक माहिती येथे वाचा ....

गोकुळाष्टमी


मूल्यांकन : Average Rating : 6.43 From 23 Voter(s) | वाचक संख्या : 2833


तिथी व इतिहास

           श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.

 

वैशिष्ट्य

          `गोकुळाष्टमी' या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.

 

उत्सव साजरा करण्याची पद्धत


           गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

 

दहीकाला


       विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला' होय. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्‍तीचे निदर्शक आहेत.

पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्‍तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)

दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्‍तीचे प्रतीक

दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्‍तीचे प्रतीक

ताक : गोपींच्या विरोधभक्‍तीचे प्रतीक

लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्‍तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

 

गोकुळाष्टमीच्या प्रथेची सुरुवात कशी झाली ? 

           श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात व तेव्हा प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. काला म्हणजे विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी एकत्र कालविणे. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्यांचा काला केला व सर्वांसह तो खाल्ला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

 

गोकुळाष्टमी साजरी करण्याची पारंपरिक पद्धत व महत्त्व

           श्रावण वैद्य अष्टमीस मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी जन्माष्टमीचे व्रत करण्याची प्रथा पडली आहे. हे व्रत पुढीलप्रमाणे केले जाते. सप्‍तमीच्या दिवशी एकभुक्‍त राहून अष्टमीला पांढर्‍या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून पूजास्थान लतापल्लवाने सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सुती कारागृह तयार करतात. मंचावर देवकी-कृष्णाच्या मूर्तींची स्थापना करतात, तर दुसर्‍या बाजूस यशोदा व तिची कन्या, वसुदेव, नंद यांच्या मूर्ती बसवतात. मध्यरात्री शूचिर्भूत होऊन, `श्रीकृष्ण पूजां करिष्ये' असा संकल्प करतात व श्रीकृष्णाची सहपरिवार षोडशोपचार पूजा करतात. रात्री कथापुराण, नृत्य-गीत इत्यादि कार्यक्रम करून जागरण करतात.

           अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाचा नैवेद्य दाखवतात. नवमीच्या दिवशी पंचोपचारांनी उत्तर पूजा करून महानैवेद्य समर्पण करतात. मृत्तिकेच्या मूर्ती असल्यास त्या जलात विसर्जन करतात. श्रीकृष्णाची धातूची मूर्ति असल्यास ती देव्हार्‍यात ठेवतात किंवा ब्राह्मणाला दान देतात. कृष्णजयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात या श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सवाच्या निमित्ताने दहिकाला होतो. तेव्हा `गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ।' अशी गाणी म्हणत पुरुष रस्त्याच्या दुतर्फा तेथील परिसरातू्न नाचत गात जातात. दहीहंड्या फोडत दहिकाल्याचा उत्सव साजरा करतात. त्यांच्यावर रस्त्यात माणसे घराघरातून पाण्याच्या घागरी ओततात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून श्रीकृष्ण चरित्रातील श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारीत देखावे दाखवण्यात येतात. अजूनही काही भागांत पूर्वीच्या रूढी, परंपरा चालू आहेत.

संदर्भ : सनातन संस्थानिर्मित ग्रंथ ' सण,धार्मिक उत्सव व व्रते '




संबंधित लेख

» श्री गणेश चतुर्थी
» महाशिवरात्री
» नारळी पौर्णिमा
» रक्षाबंधन


प्रतिक्रिया

अतुल बिबवे
August 30, 2010, 6:35 pm

सध्या आपल्याकडे संस्कृती म्हणजे काय हे ही सांगावे लागते, अश्या काळात बाल संस्कार सारखे उपक्रम लहानांनाच काय , पण आम्हा मोठ्यांनाही उपयोगी आहे .
आपला उपक्रम दिवसेंदिवस अनेक लोकांसमोर यावा, आणि सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना, तशाच तुम्हालाही शुभेच्छा .

अतुल बिबवे.
सागर सारंग
August 29, 2010, 9:30 pm

खूपच चांगले लेख आहेत. खरोकर चांगली व उपयुक्त माहिती सादर केली जाते.
pratima
August 28, 2010, 8:58 pm

चान ahe
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate