Select Language : Hindi , English , Kannada  

आंतरिक शोध

आरती,संग्रह,Arati,Mi,Marathi,Manus,hindi,आरती संग्रह,गणेश महिमा, गणेश पूजन, मोदक, अष्टविनायक, अष्टगणेश, गावचा गणपती, सिध्दिविनायक, श्रीगणेशा, श्री गणेशाय नम, लंबोदर, श्रीगणेशाचे, श्रीगणेश,,Ganesh, Ganapati, Shri Ganesh, Ganesh Festival, Ganesh Mahima, Ganesh Pujan,<!--@@CommonKeywords@@-->

महाराणा प्रताप

Clear List

अधिक माहिती येथे वाचा ....

हनुमान जयंती


मूल्यांकन : Average Rating : 6.53 From 36 Voter(s) | वाचक संख्या : 5508


 

तिथी

           काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. जन्माचा इतिहास राजा दशरथाने पुत्रप्राप्‍तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.

 

उत्सव साजरा करण्याची पद्धत

        या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.

 

हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीतजास्त का करावा ?

          `हनुमान जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो. 

 

पुत्र व्हावा ऐसा गुंडा । त्याचा ब्रम्हांडी ( तिन्ही लोकी ) झेंडा ।।
की जन्मताच अशी सुखद परिचित अंजनी मातेला देणारा हनुमान

जन्मताच सूर्याकडे झेप :  राजा दशरथाने पुत्रप्राप्‍तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता, यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे :

        अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर `उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने    आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले.

        जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे.

 

कठोर आराधनेमुळे अंजनाच्या पोटी शंकराचा जन्म

        मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात. स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्‍वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्‍वासन देतात. तिला मंत्र सांगतात. अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते. झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो.

 

महापराक्रमी

अ. राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले - `वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता, सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.' हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धुम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य वीरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरी आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.

आ. अत्यंत बलशाली असलेल्या हनुमानाने सीतेच्या शोधासाठी ३२ किलोमीटर समुद्री अंतर पोहून पार केले. याबाबत वाल्मीकी रामायणात स्पष्ट उल्लेख आहे.

यं यं देशं समुद्रस्य जागाम स महाकपि: ।
तस्य तस्योरुवेगेन सोन्माद इव लक्ष्यते ।।

अर्थ : महाकपि (हनुमान) समुद्राच्या ज्या भागातून जात होता, तो भाग त्याच्या मांड्यांच्या वेगामुळे उन्मत्त झाल्यासारखा वाटत होता. यावरून हनुमानाच्या सामर्थ्याची आपण कल्पना करू शकतो. - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य)

 

अनेक कला, नैपुण्य, गुण, यांचा समुच्चय

अ. `ज्ञान-विज्ञान, कलासंपन्न व प्रगत अशा जातीचा प्रमुख नेता हनुमान उच्च विद्याविभूषित, ज्योतिषशास्त्र व अनेक कला यांचा ज्ञाता होता. बल, बुद्धी, विद्या, शौर्य व पराक्रम या अद्वितीय गुणांचा तो धनी होता. `हनुमान हा भाषाकोविद असून वेद व व्याकरण त्याने अभ्यासिले असावेत', असे मत स्वत: श्रीरामाने प्रकट केले आहे.

आ. वीणावादक असलेल्या हनुमानाची शास्त्रीय संगीतातील तीन प्रमुख संगीताचार्यांत गणना केली जाते. (अन्य दोन संगीताचार्य शार्दुल व कहाल होत.) `संगीत परिजात' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ हनुमानाच्या संगीत सिद्धांतावर आधारित आहे. त्याने प्रतिपादलेल्या `हनुमत् संगीत पद्धती'ला भारतीय शास्त्रीय संगीतात विशिष्ट स्थान आहे. त्याचे व्यक्‍तीमत्त्व म्हणजे भक्‍ती, शक्‍ती व युक्‍ती यांचा अपूर्व संगम होय. या श्रेष्ठ व्याकरणकाराचे व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, वार्तिक, भाष्य व संग्रह इत्यादींवर असामान्य प्रभुत्व होते.' - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य, पृष्ठ २१)

 

ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचे प्रतीक असलेला हनुमंत !

        हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्‍ती करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्याच्यात स्थितीचे (तारक) सामर्थ्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव-पांडव यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती.

 

भूत, राक्षस यांसारख्या वाईट शक्तींपासून रक्षण

अ. सगळया देवतांमध्ये फक्‍त मारुतीला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला `भुतांचा स्वामी' म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.

आ. लग्न न होणार्‍यांपैकी जवळजवळ ३० टक्के व्यक्‍तींचे लग्न भूत, करणी इत्यादी वाईट शक्‍तींच्या त्रासामुळे होत नाही. मारुतीच्या उपासनेने ते त्रास दूर होतात व लग्न होणे शक्य होते. (१० टक्के व्यक्‍तींचे लग्न भावी वधू किंवा वर याच्या अवास्तव अपेक्षा असल्याने होत नाही. त्या संदर्भात अपेक्षा कमी केल्या की लग्न होते. ५० टक्के व्यक्‍तींचे लग्न प्रारब्धामुळे होत नाही. प्रारब्ध मंद किंवा मध्यम असल्यास कुलदेवतेच्या उपासनेने प्रारब्धामुळे असणारा अडथळा नष्ट होऊन लग्न होऊ शकते. तीव्र प्रारब्ध असल्यास केवळ संतकृपेनेच लग्न होऊ शकते. उरलेल्या १० टक्के व्यक्‍तींचे लग्न इतर आध्यात्मिक कारणांमुळे होत नाही. त्यासाठी त्या त्या कारणाप्रमाणे उपाय योजावे लागतात.




संबंधित लेख

» गोवर्धन पर्वत
» रामभक्त हनुमान
» गणपति
» गणपतीचे मारक रूप
» महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी
» राम नाही, तर मोत्याची माळही कवडी मोलच!


प्रतिक्रिया

राजेश संजय शेट्टी
July 10, 2011, 10:39 am

मला तुमची गोष्ट खूप आवडली

|| ओम हनुमान्ताय नमः ||
विकास पाटील
April 16, 2011, 6:28 pm

श्रीराम जय राम जय जय राम ......श्रीराम जय राम जय जय राम .....श्रीराम जय राम जय जय राम ....श्रीराम जय राम जय जय राम ....श्रीराम जय राम जय जय राम .....श्रीराम जय राम जय जय राम ...श्रीराम जय राम जय जय राम ...
Santosh Garud
April 4, 2011, 1:14 am

माहिती चांगली आहे.
गणेश
January 9, 2011, 2:58 pm

मी सुद्धा हनुमानाची उपासना करतो.
मला शिव, हनुमान, व शनीदेवाची उपासना करायची आहे कृपया मार्गदर्शन करावे
जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपिश तिहु लोग उजागर,
रामदूत अतुलित बल्भामा,
अंजनीपुत्र पवनसुत नाम.

श्री राम दूत अंजनी सुत पावन पुत्र हनुमान कि जी

हं हनुमान्त्ये रुद्रात्मकाय हम फत्त


जय हनुमान
vikas andhale
October 26, 2010, 3:17 pm

mla hi story khup aavdli mi aapla dharm saglya madhey pasrau shakto pan tyasathi sagli mahiti pahje thanks
अभिजित राक्षे
October 6, 2010, 9:11 pm

खूप सुंदर अशी गोष्ट आहे.

जय श्रीराम जय हनुमान.
गीरीजय प्रभू देसाई
April 9, 2010, 5:20 am

balsanskar .com हि एक उत्तम site आहे.. याचा प्रसार जास्तीच जास्त जाला पाहिजे.
मी छोट्या मुलांच्या शिबिरात ह्या site ची माहिती सांगणार.....
विवेकव
March 29, 2010, 5:27 pm

खूप छान माहिती आहे .
मुग्धा पानवलकर
March 29, 2010, 3:53 pm

आपले सर्वच लेख खूप छान असतात.मुलांना वाचण्यासाठी व वाचून दाखवायला छान आहेत. भरपूर माहिती मिळते.
swapnil
March 29, 2010, 3:41 am

खूप छान लेख आहे. वाचून बाल हनुमानाची आठवण झाली. आणि बाकी संकेतस्थळहि खूप छान आहे.
विजय जाधव
March 28, 2010, 9:09 pm

खूप छान माहिती दिली आहे.
प्रतिक्रिया नोंदवा मराठीत टंकलेखन करा (Press Ctrl+g to toggle between English and मराठी)
* नाव


* आपला विरोप पत्ता (Email Address)


* गाव नगरी




*Image Validation (?)


*प्रतिक्रिया





लेखाबद्दल आपले मूल्यांकन नोंदवा :

1

2

3

4

5

6

7

8

9

10
कमी जास्त
Children,Fairy Tales,Kids,Kids Stories, children stories, parents, teachers
Vadhdivas
Participate